X Close
X
9821006358

दिलखुलास कार्यक्रमात बीडचे जिल्हाधिकारी एम.डी. सिंह


beed-collecto21-1024x684
Mumbai:मुंबई, दि. 29  : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित दिलखुलास कार्यक्रमात प्रधानमंत्री पीक विमा योजना या विषयावर बीडचे जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांची मुलाखत घेण्यात आली आहे. ही  मुलाखत बुधवार दि. 30 आणि गुरुवार दि. 31 मे रोजी आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून सकाळी  7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका पुनम चांदोरकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.          प्रधानमंत्री पीक विमा योजनेत बीड जिल्ह्याचा देशात प्रथम क्रमांक आला यासाठी जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांचे लाभलेले मार्गदर्शन. प्रधानमंत्री पीक विमा योजना कशाप्रकारे यशस्वी करण्यात आली. यासाठी वेगवेगळ्या विभागांचे लाभलेले सहकार्य, योजना राबविण्या मागचा दृष्टिकोन व नियोजन, जिल्ह्याच्या विकासासाठी पुढील ध्येय आदी विषयांची माहिती श्री.  सिंह यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.
Achukvarta