X Close
X
9821006358

राज्य अधिस्वीकृती समितीच्या बैठकीस महाबळेश्वर येथे प्रारंभ


Acc-Meeting-2-1-1024x678
Mumbai:सातारा दि. 12  : महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समितीच्या राज्यस्तरीय बैठकीला महाबळेश्वर येथील राजभवनच्या दरबार हॉलमध्ये आज दि. 12  मे 2018रोजी समितीचे अध्यक्ष यदुनाथ जोशी यांच्या अध्यक्षतेखाली  सुरूवात झाली.        यावेळी समितीचे सदस्य सचिव तथा संचालक शिवाजी मानकर, औरंगाबाद-लातूर विभागाचे संचालक देवेंद्र भुजबळ, सदस्य सर्वश्री रवींद्र बेडकीहाळ, प्रदीप मैत्र, संजय तिवारी, पूजा शहा, विनोद जगदाळे, लक्ष्मीदास इनामदार, योगेश त्रिवेदी, किरण नाईक, धनंजय जाधव, नंदकुमार सुतार, सुधीर महाजन, विलास मराठे, बालाजी सुर्यवंशी, अमरावती-नागपूर विभागाचे प्र.संचालक राधाकृष्ण मुळी, पुण्याचे उपसंचालक मोहन राठोड, उपसंचालक गोविंद अहंकारी, लातूरचे उपसंचालक यशवंत भंडारे, कोकण भवनचे प्र. उपसंचालक अनिरूध्द अष्टपुत्रे, नाशिकचे प्र. उपसंचालक किरण मोघे, कोल्हापूर विभागाचे सहाय्यक संचालक सखाराम माने  उपस्थित होते.       बैठकीच्या सुरूवातीला पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष राजा माने यांनी अध्यक्ष यदुनाथ जोशी व सदस्य, सचिव शिवाजी मानकर यांचे स्वागत केले. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांचे विशेष कार्य अधिकारी विकास वाळूंजकर यांन समितीच्या पदाधिकारी व सदस्यांचे  स्वागत केले. तसेच पत्रकारांच्यावतीने वाई तालुका  पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दत्ता मर्ढेकर, भद्रेश भाटे, विश्वास पवार, महाबळेश्वर तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी संजय दस्तुरे यांनी अध्यक्ष व सदस्य सचिवांचा सत्कार केला.  प्रारंभी संचालक देवेंद्र भुजबळ लिखीत ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाज्वल्य पत्रकारिता’ हे पुस्तक सर्व सदस्यांना भेट देण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन  पुण्याचे उपसंचालक मोहन राठोड यांनी केले.       बैठकीत पुणे, नागपूर, अमरावती, कोकण भवन, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर विभागातून आलेल्या अर्जांवर चर्चा करुन निर्णय घेण्यात आले.
Achukvarta