X Close
X
9821006358

९८ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन मुलुंड येथे प्रचंड उत्साहात आणि रसिकांच्या उत्तम प्रतिसादात साजरे झाले.


Marathi-Natya-Sammelan-Mulund-Logo-682x1024
Mumbai:दिनांक १३, १४, आणि १५ जून या कालावधीत मुलुंड येथील महाकवी कालिदास नाट्यमंदिर – प्रियदर्शनी क्रीडा संकुल येथे मोठ्या उत्साहाने ९८ वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन रसिकांच्या प्रचंड प्रतिसादाने संपन्न झाले… या नाट्यसंमेलनाची सुरवात दिनांक १३ जून रोजी सकाळी ६.३० वाजता महाकवी कालिदास नाट्यमंदिरात चौरंग निर्मित ” मराठी बाणा ” ह्या कार्यक्रमाने झाली हा कार्यक्रम अशोक हांडे यांनी मोठ्या उत्साहात सादर केला, दुपारी ४ वाजता ” नाट्यदिंडी ” ला सुरुवात झाली, या नाट्य दिंडी मध्ये मा. विनोद तावडे ( सांस्कृतिक कार्य मंत्री ), नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, आमदार सरदार तारासिंग,मधुरा वेलणकर, अशोक नारकर, दिगंबर प्रभू, शरद पोंक्षे, प्रदीप वेलणकर, भरत जाधव, विजू माने, समीर चौगुले, अविनाश नारकर, डॉ गिरीश ओक, ऐश्वर्या नारकर, ऋतुजा देशमुख, मानसी जोशी, शुभांगी सदावर्ते, असे अनेक मान्यवर कलाकार आणि रसिक मंडळी होती, या नाट्यदिंडी मध्ये धनगरी गोफ, सिंधुदुर्ग मधील सहाफुटी कोंबडा, तारपा, बोहडा, असे आदिवासी नृत्य प्रकार, मोरया ढोल ताशा पथक,दांडपट्टा, असे अनेक प्रकाराने हि नाट्यदिंडी सजली होती, सायंकाळी प्रियदर्शनी क्रीडा संकुल येथील सुधा करमरकर रंगमंचावर ९८ व्या नाट्य संमेलनांचा उदघाटन समारंभास नांदीने सुरवात झाली, त्या नंतर स्वागताध्यक्ष मा विनोद तावडे { सांस्कृतिक कार्य मंत्री },प्रमुख पाहुणे मा. शरद पवार { अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी }, मा राज ठाकरे { अध्यक्ष मनसे }, उदघाटक सतीश आळेकर [ ज्येष्ठ रंगकर्मी ], जयंत सावरकर [ अध्यक्ष ], कीर्ती शिलेदार [ नियोजित संमेलनाध्यक्ष ], प्रसाद कांबळी [ नाट्य परिषदेचे अध्यक्ष ], असे रंगमंचावर उपस्थित होते. मान्यवरांनी नटराज पूजन केल्यानंतर उल्हास सुर्वे यांनी तिसरी घंटा दिल्यानंतर उदघाटन समारंभास सुरवात झाली,, सुरवातीला परिषदेचे प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे यांनी प्रास्ताविक भाषणात परिषदेच्या निवडणुकीचा आढावा घेऊन आम्ही २ महिने सहा दिवसात नाट्य संमेलनाची आखणी केली या मध्ये अशोक नारकर आणि दिगंबर प्रभू यांचा सिंहाचा वाटा आहे हे नमूद केलं. परिषद हि व्यावसायिक, प्रायोगिक, बालरंगभूमी बरोबर जोडलेली आहे असे सांगून सभासद संख्या वाढवणे, वर्षभर कार्यक्रम करणे, मासिक बैठक घेणे, असे धोरण परिषदेने स्वीकारले असून जुलै महिन्या पासून प्रत्येक शाखेला भेटी देणार आहोत, या नाट्य संमेलनात बाहेरगावी नाट्य प्रयोग करणारे वितरक यांचा सन्मान परिषद करणार आहे, त्यानंतर माननीय विनोद तावडे [ सांस्कृतिक कार्य मंत्री ], यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि, २५ वर्षानंतर पुन्हा एकदा मुंबई मध्ये संमेलन घेण्याची पर्वणी आली आहे, ६० तासाचा सलग नाट्य संमेलन सुरु झाला आहे, या मध्ये लोककलांचा अविष्कार आहे, एकही व्यावसायिक नाटक नाही, नंतर परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी म्हणाले, नाट्य परिषद हि केवळ नाट्यपरिषदेच्या वास्तुपुरती मर्यादित न राहता अधिकाधीक व्यापक कशी होईल हे बघणं खूप महत्वाचं आहे. व्यापक म्हणजे काय तर रंगभूमीशी निगडित सर्व घटकांचं परिषद हे केंद्र झालं पाहिजे, नाटक ते प्रेक्षक ह्या दोन समृद्ध बेटांना जोडणारा भक्कम सेतू म्हणून परिषदेकडे पाहिलं गेलं पाहिजे, ह्याचंच पहिले पाऊल म्हणजे यंदाचं हे ६० तासच संमेलन. मुंबईकरांना महाराष्ट्र दाखवणं गरजेचं आहे मग झाडीपट्टीची नाटकं असो किंवा इतर लोककला असो अश्या घटकांना संमेलनात सामील करून घेण्याची आवश्यकता होती, परिषद हि अधिकाधिक व्यापक करण्यावर आमचा संकल्प आहे. कारण ह्या परिषदेला ” अखिल भारतीय “म्हणण्यामागे सगळ्यांना जोडण्याचं आमचं स्वप्न आहे. ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांनी संमेलनाचे उदघाटन केल्यावर विचार मांडताना ते म्हणाले, नाटक हि एक नागरी अर्थात शहरी करमणूक आहे, ग्रामीण भागात तमाशा–खेळे–दशावतार हि करमणूक असते. नाटक सादर करताना नाटकाच्या आर्थिक गणिताचा – व्यवसायाचा विचार व्हायला पाहिजे असे सांगून ते म्हणाले नाटकाचा व्यवसाय करताना त्याचे व्यवस्थापन व्यवस्थित करणे महत्वाचे आहे, २५ वर्षात अनेक नाटके बदलली, नवीन विषय घेऊन संहिता येतात, परिषदेने प्रत्येक ठिकाणी चिंतन शिबीर घ्यायला पाहिजे, नाटक आणि समाज यांचा अभ्यास व्हायला हवा. माजी अध्यक्ष जयंत सावरकर यांनी सांगितलं कि नाट्यगृहाची स्थिती गंभीर आहे. त्याकडे नाट्यगृहाच्या व्यवस्थापन मंडळीने लक्ष द्यायला हवे, तसेच कलाकारांना पेन्शन मिळायला हवे, निदान जगण्यापुरती तरी रक्कम मिळायला हवी. नाटकाची चळवळ सर्वदूर रुजली पाहिजे असे सांगून सेवाभावी वृत्तीने काम करण्यास पुढे यायला हवे. त्यानंतर संमेलनाध्यक्षांची सूत्रे त्यांनी कीर्ती शिलेदार यांना प्रदान केली त्यानंतर सई परांजपे, विजया मेहता, मोहन जोशी, प्रशांत दामले यांचा सत्कार करण्यात आला. मनसेचे अध्यक्ष मा राज ठाकरे म्हणाले, नाटक हा मराठी माणसाचा जिव्हाळाचा विषय आहे, तुमची जबाबदारी मोठी आहे. मराठी माणसाला चित्रपटापेक्षा नाटकाचे वेड जास्त आहे, नाटके येतात पण त्यातील चालतात किती, चुकीच्या गोष्टी नाट्यक्षेत्रात शिरलेल्या आहेत त्या बाजूला करणे हि तुमची जबाबदारी आहे. भव्यता आणि संहिता ह्या दोन गोष्ठी जर एकत्र आल्या तर मराठी प्रेक्षक मराठी नाटकाकडे नक्की येईल. आजच्या तरुण–तरुणीना मोबाईलच्या माध्यमातून सगळं जग दिसत आहे, त्याला जगामध्ये चाललेली थिएटर्स दिसतात, नाटके दिसतात, तो जो भव्यपणा आहे तो मराठी नाटकामध्ये हवा आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष मा शरद पवार म्हणाले, सतीश आळेकर यांनी मराठी नाटकाला एक दिशा दिली आहे, महाराष्ट्राची नाटक हि वैभवशाली परंपरा आहे. कीर्ती शिलेदार यांच्याकडील संगीत नाटकाचे योगदान पन्नास वर्षाच्या पेक्षा अधिक आहे. नाविन्याचा ध्यास लागला पाहिजे, नवनवीन कलाकार रंगभूमीवर येण्यासाठी बालरंगभूमीचा पाया मजबूत केला पाहिजे, आजची बालरंगभूमी हि उद्याची प्रायोगिक रंगभूमी आहे, आजची प्रायोगिक रंगभूमी हि उद्याची व्यावसायिक रंगभूमी आहे, ह्या तिन्हीकडे आपण एका वेगळ्या दृष्टीकोनातून बघण्याची काळजी घेतली पाहिजे. मराठी रसिक हा उत्तम नाटके पाहण्यास येतो त्यासाठी नाटकाचा आशय आणि विचार याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. त्यानंतर संमेलनाच्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितलं कि, वर्षानुवर्षे पंढरीची वारी करणाऱ्या सर्व सामान्य वारकऱ्याला अचानक आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाच्या महापूजेचा मान मिळाला तर त्याची जी अवस्था होईल असे माझे काहीसे झाले आहे. माझे आई–वडील हे संगीत नाटकाचे वारकरी, त्यामुळे त्यांनी दिलेला संगीत नाटकाचा वसा मी घेतला असून हा वसा मी उतणार नाही, मातणार नाही आणि घेतलेला वसा मी टाकणार नाही, संगीत नाटकाचे खेळणं हे माझ्याकडे आई–वडिलांनी सोपवलं, आम्ही संगीत नाटकांच्या बरोबर इतर नाटके सुद्धा सादर करतो, मला लहानपणापासून मा. दत्ताराम बापू, नीलकंठबुवा अभ्यंकर यांच्या कडून तालीम मिळाली, भूमिकेचा भावार्थ जाणा, तो चेहऱ्यावर आणा आणि मग आपली भूमिका सादर करा असे सांगून त्या पुढे म्हणाल्या कि या निमित्ताने मला असं वाटत कि, जिथे–जिथे आपण नाटक हा विषय शिकवतो तिथे संगीत नाटका विषयी सुद्धा शिकवायला पाहिजे, त्यामुळे आपणाला चांगले संगीत कलाकार मिळतील, संगीत नाटक हि जागतिक देणगी आहे. आपण संगीत नाटकाकडे गांभीर्याने पाहायला हवे. मला संगीत नाटकासाठी जे जे करता येईल ते सगळं करण्याची माझी तयारी आहे. दीनानाथ घारपुरे [ ९९३०११२९९७ ] 
Achukvarta