X Close
X
9821006358

नागरिकांच्या आरोग्याबाबत अन्न व औषध प्रशासन विभाग सदैव जागरुक – मंत्री जयकुमार रावल


jaykumar-Rawal-683x1024
Mumbai:मुंबई, दि. 19 : नागरिकांच्या आरोग्याबाबत अन्न व औषध प्रशासन विभाग सदैव जागरुक असून नागरिकांनी सुरक्षित व मानदाप्रमाणे अन्नपदार्थ मिळतील यांची काळजी घेत आहे. अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यावासायिकांवर खटला दाखल करणे, न्यायनिर्णय करणे, दंड करणे, परवाना निलंबित करणे यासारखी कारवाई करण्यात येत असल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. सदस्य अमित देशमुख यांनी लक्षवेधीला उत्तर देताना श्री.रावल बोलत होते. श्री.रावल म्हणाले, मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने उघड्यावर विक्री केल्या जाणाऱ्या लिंबु सरबतासाठी वापरण्यात येणाऱ्या पाणी व बर्फाचे नमूने घेतले असून 280 नमुन्यांपैकी 218 नमूने दुषित आढळून आले आहेत. तसेच ऊसाच्या रसासाठी वापण्यात येणाऱ्या बर्फाच्या 303 नमून्यांपैकी 268 नमूने व इतर बर्फाच्या 385 नमुन्यांपैकी 300 नमूने दुषित आढळून आले आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच 1 एप्रिल ते 15 मे 2019 या कालावधीत मुंबईतील 8012 फेरीवाल्यांवर कारवाई करुन 21 हजार 463 किलो खाद्यपदार्थ, 36 हजार 54 लिटर सरबत व 1 लाख 16 हजार 823 किलो बर्फ जप्त करुन  नष्ट करण्यात करण्यात आलेले आहेत. फेरीवाल्यांकडे दूषित खाद्यपदार्थ व पेय पदार्थ नियमितपणे जप्त करुन नष्ट करण्याची कारवाई करण्यात आलेले आहे. यावेळी झालेल्या चर्चेत राज्यमंत्री मदन येरावार, आमदार सर्वश्री अजित पवार, संजय केळकर यांनीही सहभाग घेतला. The post नागरिकांच्या आरोग्याबाबत अन्न व औषध प्रशासन विभाग सदैव जागरुक – मंत्री जयकुमार रावल appeared first on Achuk Varta Newsportal.
Achukvarta