X Close
X
9821006358

बारावीची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने सादर करण्यास 24 जूनपर्यंत मुदतवाढ


Mumbai:

मुंबई, दि. 19 : जुलै -ऑगस्ट २०१९ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यास 24 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत नियमितपुनर्परिक्षार्थीनाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीनुसार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बारावीची परीक्षा जुलै- ऑगस्ट 2019 मध्ये घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने www.mahahsscboard.maharashtra.gov.in किंवा www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावयाची आहेत.

विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक विद्यालय/ कनिष्ठ महाविद्यालयामार्फत ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्रे 15 ते 24 जून या काळात भरता येणार आहे. यानंतर उच्च माध्यमिक विद्यालय/ कनिष्ठ महाविद्यालयांनी 24 ते 29 जून या काळात बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाचे आहे. उच्च माध्यमिक विद्यालय/ कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करण्याची तारीख 2 जुलै असणार आहे.

बारावी परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने नियमित शुल्काने सादर करण्याची तारीख 3 ते 14 जून 2019 होती. मात्र विद्यार्थी हित लक्षात घेऊन दि. 15 ते 24 जूनपर्यंत ऑनलाईन आवेदनपत्रे विलंब शुल्कानुसार सादर करण्यास  मुदतवाढ देण्यात आली आहे.

The post बारावीची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने सादर करण्यास 24 जूनपर्यंत मुदतवाढ appeared first on Achuk Varta Newsportal.

Achukvarta