X Close
X
9821006358

योगगुरू रामदेवबाबा यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट


Hon-cm-sir-Ramadev-baba-meet-3-1024x683
Mumbai:आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाचे निमंत्रण मुंबई, दि. १९ : योगगुरू रामदेवबाबा यांनी आज येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान भवनात सदिच्छा भेट घेतली. आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त २१ जून रोजी नांदेड येथे होणाऱ्या भव्य कार्यक्रमाचे निमंत्रण तसेच राज्य भरातील आयोजन याबाबत योगगुरू रामदेवबाबा यांनी चर्चा केली. राज्यातील या उपक्रमात विविध घटक उत्स्फुर्त सहभाग नोंदवत आहेत.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदीं यांच्या सहभागामुळे आंतरराष्ट्रीयस्तरावरूनही मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी नमूद करून समाधान व्यक्त केले. यावेळी आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण व क्रिडा मंत्री आशिष शेलार, आमदार राज पुरोहीत आदी उपस्थित होते. The post योगगुरू रामदेवबाबा यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट appeared first on Achuk Varta Newsportal.
Achukvarta